Share

इमरान हाश्‍मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाचे संकट वाढल्याने सरकारकडून  काही नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे अनेक क्षेत्राना अडचणीचा सामना करावा लागला आहे. यातील एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून अनेक सुपरस्टार्स  डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपला चित्रपट प्रदर्शित करत आहेत. मात्र काही चित्रपट सिनेमागृहात देखील प्रदर्शित करण्यात आली.

यातच इमरान हाश्‍मीचे लीड रोल असलेले ‘मुंबई सागा’ आणि ‘चेहरे’ हे दोन चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये रिलीज झाले. इमरान हाश्‍मीने आपल्या करिअरमध्ये अनेक हॉरर चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘राज’, ‘राज रिबूट’, ‘एक थी डायन’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता इमरान आणखी एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरान ‘एज्रा’ या हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानचा हा चित्रपट बनून तयार आहे. हा चित्रपट 2017 मध्ये आलेल्या याच नावाच्या एका मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे.

बॉलीवूडमध्ये हॉरर चित्रपट फारसे बनत नाहीत आणि जरी बनले तरी देखील या चित्रपटांमध्ये फारसा फरक नसतो. त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असायला पाहिजे कथेची मांडणी तरी वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, असे इमरानला वाटते. तसेच इमरानला हॉरर चित्रपट आवडते कारण हे करत असताना आपल्या डोक्‍याला ताप देण्याची गरज नसते. सगळे काही भूतावर सोडून द्यायचे असते, असेही इमरानला वाटते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!