जळगाव : मागील काही दिवसांमध्ये बोदवड तसेच मुक्ताईनगर येथील १४ भाजप नगरसेवक शिवसेनेत गेलेत. यावर प्रतिक्रिया देत शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले होते की,’नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा धक्का आहे, कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या.’ याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षप्रवेशा संदर्भात प्रतिक्रिया देत महाजन म्हणाले की,’भारतीय जनता पक्षाला कुठलाही धक्का बसलेला नाही, गेलेले नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. खडसे यांचीच ती माणसं होती, खरं तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणं अपेक्षित होती. मात्र कुणीही राष्ट्रवादीत गेले नाहीत.’ तसेच मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही. आज बोदवड येथेही तीच परिस्थिती आहे. ते सारखं ‘माझा मतदारसंघ- माझा मतदारसंघ’ करत असतात. मात्र आज त्यांचं तिथे काय आहे? आता निवडणुका होतील त्या वेळी आम्ही दाखवू’ असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.
दरम्यान, पुढे महाजन म्हणाले की,’मागील तीस वर्षांपासून खडसे तिथे भाजपचे आमदार होते, पक्षाने त्यांना मंत्री केले होते. लाल दिव्याची गाडी त्यांना दिली होती, त्यामुळे निवडून आलेली माणसे त्यांची होती. मात्र आता ही माणसे त्यांची राहिलेली नाहीत. शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ते गेलेले आहेत. परंतु येणाऱ्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आम्ही भाजपाचे अस्तित्व दाखवून देणार आहोत.’
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- इमरान हाश्मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

