Share

‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल

Published On: 

इंदोर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्या परदेशी असल्याच्या मुद्द्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या तर काँग्रेस प्रमुख सोनिया गांधीं का नाही? असा रोखठोक सवाल आठवलेंनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी हॅरिस यांच्यासोबत तेथे बैठक घेतली होती. त्यानंतर शनिवारी(२५ सप्टें.)इंदोर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना आठवलेंनी हे विधान केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीला २००४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता’. तसेच ‘जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी, भारताच्या नागरिक, राजीव गांधी (माजी पंतप्रधान) यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या, पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?’ असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, ‘पवार हे जननेते म्हणून पंतप्रधानपदासाठी पात्र होते आणि काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते’ असेही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!