नाशिक : नाशिक ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे यासाठी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने नाशिक येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चा च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे तसेच तानसेन ननावरे ,नाना भालेराव, किशोर घाटे सागर गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नावाबाबत आंबेडकरी समाज आग्रही असल्याची भावना व्यक्त केली यावेळी सदर मागणीसाठी शक्य तितक्या लवकर निर्णय घेऊ व यास्तव मुंबई मंत्रालय येथे आंदोलक लोकांसमवेत शिष्टमंडळासह विशेष बैठक आयोजित करू असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती राहुल डंबाळे दिली आहे.
नाशिक ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे . आंबेडकरी जनतेच्या वतीने या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यासह राज्यभर बैठकीचे आयोजन राहुल डंबाळे यांनी केले होते.
नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे यांचे नाव देण्यासाठी बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष आहे त्यासाठी पुन्हा एकदा मागणी जोर धरत आहे .त्यासाठीच 9 ऑगस्ट रोजी नाशिक येथील महामोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना तील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेऊन सहभागी झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी बोलविलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यास राज्यभर अतिशय तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा राहुल डंबाळे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील १,२८,३३५ शाखा फडकविणार राष्ट्रध्वज
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; आंदोलनं कसली करताय ?’, मुख्यमंत्री भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
