नागपूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय. दरम्यान, नागपूरचे महापौर संदीप जोशी हे राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पदवीधर निवडणूकीत पराभव स्वीकारत राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते सध्या नॅाट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या राजीनाम्याविषयी भाजप अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विचारलं असता अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे याबद्दल आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

