Share

घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना

Published On: 

जयपूर : आयएएस अधिकारी टीना डाबी आणि तिचा आयएएस पती अथर आमिर यांनी 2015 मध्ये यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. वृत्तानुसार, दोघांनी 17 नोव्हेंबर रोजी जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

टीना डाबी या 2015मध्ये आयएएस परीक्षेत टॉप करून चर्चेत आल्या होत्या. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षीच आयएएस परीक्षेत टॉप केले होते. 2018मध्ये टीना यांनी आयएस अधिकारी अतहर आमिर उल शफी खान यांच्यासोबत लग्न केले होते. आता टीना डाबी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये टीना डाबी यांनी गेल्या काही दिवसांत वाचलेल्या पुस्तकांची माहिती दिली आहे.

टीना डाबी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, की – ही लेट पोस्ट आहे, गेल्या महिन्यात मी अनेक पुस्तकं वाचली. पुस्तकं वाचल्यानंतर मी माझे विचार एका कागदावर लिहिले आहेत. याच बरोबर मी यात असा भागही सामील केला आहे, जो मला सर्वात चांगला वाटला. आशा आहे, की आपणही हे वाचतांना तेवढाच आनंद घ्याल, जेवढा मी घेतला.

यापैकी आपण एखादे पुस्तक वाचले असेल तर आपणही समीक्षा शेअर करा. याशिवाय, आपल्याला इतर काही पुस्तकांची माहिती असेल, तर तीचेही स्वागत आहे. टीना यांनी ‘अ जेन्टलमन इन मॉस्को’ पुस्तक वाचल्याचा उल्लेख करत म्हटले आहे, कि एक वाक्य आहे, की कुणीही व्यक्ती परिस्थितीवर प्रभूत्व मिळवत नाही, तर तो ते प्रभूत्व मिळविण्यास बांधील असतो.

https://www.instagram.com/p/CIdLDnhjjST/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!