नवी दिल्ली- आपल्या दमदार अभिनयाने सिनेजगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या काँग्रेस नेत्या अभिनेत्री विजयाशांती यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. दरम्यान,दिग्गज नेत्यांना,कलाकारांना पक्षात सामील करून घेत भाजप दक्षिणेत आपले वजन वाढवत असल्याचे दिसून येत आहे.
पुढील वर्षी तेलंगानामध्ये निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर विजयाशांती यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकत वाढणार आहे. विजयाशांती यांचा मोठा चाहता वर्ग दक्षिणेत आहे. विजयाशांती यांनी राजकीय जीवनाची सुरुवात भाजपमधूनच केली होती. पुढे त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला यानंतर त्यांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा त्या भाजपमध्ये आल्या आहेत.
Now actor #Vijayshanti joins @BJP4India
— Bhawana Somaaya (@bhawanasomaaya) December 7, 2020
दरम्यान, तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.अभिनय कारकीर्दीला अलविदा करत खुशबू यांनी मे २०१० मध्ये डीएमकेत प्रवेश करून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ साली एम. के. स्टॅलिन यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी डीएमकेला रामराम ठोकला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या माजी नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. उर्मिला यांनी कॉंग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी काही कारणास्तव कॉंग्रेसला राम-राम ठोकला होता.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार जबरदस्तीने शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे : राष्ट्रवादी
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- ‘APMC च्या कायद्याबाबत पवारांनी पत्र लिहिलं होतं,आता सोयीस्करपणे विसर पडला आहे’
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

