Share

आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

विहंग चौथ्या समन्सनंतरही ईडी कार्यलयात हजर झाला नाही. यानंतर, आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. तसे समन्स ईडीने प्रताप सरनाईकांना पाठवले होते. मात्र तब्बल तीन समन्स बजावून देखील अद्याप प्रताप सरनाईक चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.

टॉप ग्रुपमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना याआधीच अटक करण्यात आली होती. आता अमित चांडोले यांना ईडीच्या ताब्यात देण्यात आलं आहे. यावरूनच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘प्रताप सरनाईक यांचा मित्र/पार्टनर अमित चांडोले ईडीच्या ताब्यात. आता सरनाईकांच्या कुटुंबाने तयार राहावं!’ असं ट्विट करत त्यांनी सरनाईकांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!