मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकमत दिलेल्या मुलाखतीत खा. शरद पवार यांनी हा दावा केला आहे.
कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे.त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते.
यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. अशी प्रतिक्रया काँग्रेसचे नेते आणि महाविकासआघाडीतील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. अस थोरात म्हणाले आहेत.
तर राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
तर दुसरीकडे यावर महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. ‘आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. असा इशाराच ठाकूर यांनी थेट शरद पवार यांनाच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी दिल्लीतल्या स्टेडियमचे तुरुंग करण्यासाठी केंद्राचा दबाव; केजरीवालांचा आरोप
- आरारा…रा..रा..खतरनाक! मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक तब्बल तीन दाक्षिणात्य भाषांत येणार
- ‘भारत बंद’ला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील ‘या’ ५ मोठया बाजार समित्या राहणार बंद
- रिपब्लिक टीव्हीसह अर्णबला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!
- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

