Share

साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचे (Naga Chaitanya) वडील आणि अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) यांनी सुन समांथा (Samantha Ruth )- नागा चैतन्य घटस्फोटच्या (divorce) निर्णयावर अखेर मौड तोडले आहे. सोशल मीडियावर त्या दोघांबद्दल भरपूर चर्चा झाल्यानंतर आता नागार्जून यांनी असा काही खुलासा केला आहे, की सर्वांचे लक्ष वेधत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर समांथा- नागा चैतन्य यांच्या घटस्फोटच्या निर्णयामुळे चाहत्यांसह सर्वांना धक्का बसला. आता एका मुलाखतीत अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) सांगितले की, समांथाला घटस्फोट हवा होता आणि नागाने ते मान्य केले. नागा कुटुंबाच्या आणि माझ्या प्रतिष्ठेबद्दल आम्ही थोडे काळजीत होतो. मात्र जेव्हा ही बातमी आम्हा सर्वांसमोर आली तेव्हा आम्हालाही धक्का बसला, असा खुलासा त्यांनी केला.

Nagarjuna

मिळालेल्या माहितीनुसार एका मुलाखतीत नागार्जुन म्हणाला, “नागा चैतन्यने समांथाच्या निर्णयाचा आदर केला, मात्र तो माझ्यासाठी खूप चिंतेत होता. कारण कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे काय होईल असं नागाला वाटाल्याचं ही यावेळी सांगितले. तसेच ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते, मात्र दोघांनी हा निर्णय का घेतला हे कळत नाही. चार वर्षांच्या लग्नात आम्ही दोघांना कधीच भांडण-भांडण करताना पाहिलं नाही. दोघांनीही २०२१ चे नवीन वर्ष साजरे केले. मला वाटतं कदाचित तेव्हापासूनच दोघांमधला दुरावा वाढू लागला.

त्यानंतर सोशल मीडियावर समांथा आणि नागा यांनी संयुक्त निवेदनात लिहिले की, खूप विचारविनिमय केल्यानंतर, चैतन्य आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दशकानुशतके जुनी मैत्री आमच्या नात्याचा पाया होती हे आमचे भाग्य आहे.

नागार्जुन आणि नागा चैतन्य यांचा ‘बंगाराजू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कल्याण कृष्णा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!