औरंगाबाद: महानगरपालिकेच्या वतीने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच याठिकाणी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. शहरात येणारा प्रत्येक पर्यटक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. तसेच या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने आपण महत्वाचे पाऊल टाकत असल्याचे प्रतिपादन मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी केले.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय येथे पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक लोहमार्ग मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रशासक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मागील दोन वर्षात महानगरपालिकेने काय साध्य केले याचा आढावा घेतला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, स्मार्ट सिटी अशा विविध विषयावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी ते म्हणाले, आपले शहर स्वछ राहण्यासाठी मनपाचा प्रत्येक कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहिलेला आहे याचा मला गर्व आहे. तिसऱ्या लाटेत शहरातील नागरिकांना सुरक्षित ठेऊ शकत आहे. शहरातील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. काही काळातच ही योजना पूर्ण होऊन प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर शहराला नवीन पंख मिळल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथील घनकचरा प्रकल्प पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले आहेत. हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. २५० कोटींचे रस्ते पूर्ण झाले आहेत. उर्वरित प्रस्तावित रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहराला आणखी नवीन ओळख मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
डॉ. अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला- केशव उपाध्ये
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
दुःखद! ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन
राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या- चंद्रकांत पाटील
ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

