Share

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

Published On: 

पुणे: राज्यात कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in Maharashtra) संख्येत गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये कोरोना तसेच ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या अधिक होती. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यभरात कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पुन्हा वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यातील शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. पुण्यातील शाळा अद्याप बंद ठेवण्याचा निर्णय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान आता महापूर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Corona Positive) यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करत दिली आहे. कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल, असं ट्विट त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!