मुंबई : छोटया पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) एका फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या तयारी आणि प्रमोशनच्या निमित्ताने भोपाळला पोहोचली. तसेच तेथे एक वादग्रस्त विधान (Controversial statement) केले आहे. ज्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. या वक्तव्याचा निषेध करत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी (Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra) भोपाळ पोलिस आयुक्तांना (Police Commissioner Bhopal) २४ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान अभिनेत्री श्वेता तिवारी फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या घोषणेसाठी स्टारकास्ट प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला (Bhopal) आली होती. यावेळी श्वेता तिवारी चर्चेत सहभागी होत विनोदाच्या सुरात बोलली. मात्र वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या अडचणी वाढू शकतात. वेब सीरिजच्या घोषणेमुळे ती चर्चेत आली असून राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. मंत्री मिश्रा म्हणाले की, त्यांनी अभिनेत्री श्वेता तिवारीचे वक्तव्य पाहिले आणि ऐकले आहे. त्यांचे विधान आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. या संपूर्ण प्रकरणात वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना भोपाळ आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
फिल्म एक्ट्रेस श्वेता तिवारी के बयान को लेकर बवाल.. गृह मंत्री @drnarottammisra ने भोपाल कमिश्नर को जांच कर 24 घंटे में रिपोर्ट देने के दिए निर्देश. ऐसा क्या कहा कि एक्ट्रेस श्वेता तिवारी ने.@mohdept @bhopalcomm pic.twitter.com/WK594iWpMb
— Anurag Shrivastava (@Anuragnw18) January 27, 2022
काय आहे नेमकं प्रकरण
वेब सीरिजच्या घोषणेत श्वेता तिवारी म्हणाली, देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे. श्वेता तिवारीने हे मजेशीरपणे सांगितले असले तरी आता श्वेता तिवारी या विधानामुळे वादात सापडली आहे. श्वेता २६ जानेवारीला प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती, तिने मीडियासमोर खोटी विधानं केली, ज्यामुळे तिच्या अडचणी वाढू शकतात. या वक्तव्याचा निषेध करत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलिस आयुक्तांना २४ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे तिच्या वक्तव्याबद्दल निषेध केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
डॉ. अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला- केशव उपाध्ये
“..मग तुम्ही राष्ट्रपतींनाही राजीनामा मागणार का?”, टिपू सुलतान वादावरून संजय राऊतांचा भाजपला सवाल
“ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतानचं नाव दिलं, त्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?”
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र


