मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या कालपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.
या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत अकाउंट वरून उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

दरम्यान या संपूर्ण वादावर आता किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं असं सांगत सारवासारव केली आहे. विशेष म्हणजे या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर
यापुढे
माझा मोबाईल माझी जबाबदारी— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 3, 2021
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या स्पष्टीकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यांवर…यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी,’ असं ट्विट देशपांडेंनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवभक्तांनो…आपला जीव महत्वाचा, घरीच थांबा; संभाजीराजेंच एक पाऊल मागे
- पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील
- सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राजकारणात प्रवेश ; उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत
- ‘गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली, ते असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं’
- ‘पवारांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच भाजपने पडळकरांना आमदारकी दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

