Share

‘भाजपने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत’

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळा पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

या मुद्द्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निघणाऱ्या मोर्चांमध्ये सहभागी होऊ, असं सांगत पाठिंबा दर्शविला होता. आता मात्र, त्यांनी भाजपा स्वतः आदोलन करणार नाही, असं ते म्हणाले. ‘भाजपाने किती सन्मान दिला, हे छत्रपती संभाजीराजे सांगत नाहीयेत,’ असंही ते संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले.

मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे हे आता आक्रमक झाले असून उद्या, दि. २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!