मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर येत आहेत. यामुळे सरकारला धोका आहे या प्रश्नावर बोलताना नितीन राऊत म्हणाले की, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत काँग्रेस आग्रही असली तरी सरकारला धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे. तिथेही पदोन्नती आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये असा सवाल नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षण राहिलेच पाहिजे, या प्रश्नी काँग्रेस पक्ष आक्रमक असला तरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेसमधून पाठिंबा नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे मराठा नेते पदोन्नतीतील आरक्षणाच्या भूमिकेवर मौन बाळगून आहेत. परिणामी, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.
मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे मुद्दे राज्यात संवेदनशील आहेत. ५ मे रोजी मराठा आरक्षण खटल्यात सुप्रीम कोर्टाने विरोधात निकाल दिल्यानंतर ती कसर भरून काढण्यासाठी राज्य शासनाने ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढला. त्यानंतर काँग्रेस नेते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक झाले आहेत.
तर मराठा समाज आजही काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा जनाधार आहे. म्हणून पदोन्नती आरक्षणप्रश्नी काँग्रेस नेते आक्रमक भूमिका घेत नाहीत, असेच चित्र सध्या दिसत आहे.
राऊत हे काँग्रेसच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष असून ते विदर्भातील काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदोन्नती आरक्षणाच्या भूमिकेवर सोबत घेतले आहे. पटोले ओबीसी असून इतर मागास प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश नको, अशी त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र
- ‘राजे… वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा
- मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
