नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे जगभरात सुमारे १७ कोटी लोक बाधित झाले आहेत तर सुमारे ३५ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु विषाणूची उत्पत्ती नेमकी कोठे झाले? तो कुठून आला आहे, हे गूढ काही उकललेले नाही. त्यामुळेच त्याच्या तपासात अद्याप काहीही स्पष्टपणे समोर आलेले नाही. म्हणूनच याबद्दलचा तपास पुन्हा केला पाहिजे, अशी मागणी अमेरिकेतील तज्ञांनी केली आहे.
तपासाची मागणी करणाऱ्यांमध्ये अमेरिकी राष्ट्रपती भवन व्हाइट हाऊसचे मुख्य चिकित्सा सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांचाही समावेश आहे. चीनने यावेळी तपासात पारदर्शकता ठेवावी, असे तज्ञांनी सूचवले आहेत. फॉसी एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाच्या उत्पत्तीबाबत तपास सुरू ठेवला पाहिजे, असे आमचे मत आहे. आरोग्य संघटनेने तपासाच्या पुढच्या टप्प्यात तपास केला पाहिजे. कारण आपल्याला कोरोना विषाणू कोठून आला? ही बाब शंभर टक्के सांगता येत नाही. म्हणून या गोष्टीचा आपण तपास नव्याने केला पाहिजे.
दरम्यान,कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत पुन्हा तपास करायचा किंवा नाही याबद्दलचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेच्या आगामी बैठकीत घेतला जाऊ शकतो. हा मोठा निर्णय मानला जातो. तसे झाल्यास वुहानमधील प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडल्याच्या गृहितकाचा पुन्हा अभ्यास केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का?,’ आळंदी संस्थानचे पालखी मार्गावरील गावांना पत्र
- ‘राजे… वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा
- मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
- संपुर्ण कारकिर्दीत केवळ एका टी-२० सामन्यात खराब कामगिरी केल्याचा ‘या’ भारतीय गोलंदाजाचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

