पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले होते. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत, अस उद्धव ठाकरे यांनी म्हटले होतं.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळया दगडावर पांढरी रेष आहे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधानपद यांचा मान राखला पाहिजे. निदर्शनं, आंदोलन वेगळं. मात्र त्यांचा आदर केला पाहिजे, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“धोनीला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले”; पाकिस्तानी खेळाडूचे वक्तव्य
“… त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे पर्यायच राहिला नाही”, संभाजीराजेंची प्रतिक्रिया
“मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली?”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल


