मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जगभरात खूप लोकप्रियता आहे . अगदी सीमेपलीकडे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे राष्ट्राच्या पहिल्या क्रिकेट दौऱ्यावर एमएस धोनीच्या हेअरस्टाईलचे चाहते झाले होते. आता, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहनी यानेही खुलासा केला आहे की टी२० विश्वचषक २०२१ च्या निमित्ताने भारतीय क्रिकेटपटू धोनीला भेटणे हे त्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले आहे.
पाकिस्तानच्या या युवा गोलंदाजाने धोनीसोबतच्या मुलाखतीबद्दल सांगतिले “महेंद्रसिंग धोनीची लेव्हल समजावून सांगण्यासाठी मला खूप वेळ लागेल. त्याला भेटणे हे एक स्वप्न होते आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी मला जीवन, जीवन कसे जगावे, मोठ्यांचा आदर करणे याबद्दल सांगितले म्हणून त्यांचे शब्द खूप फायदेशीर ठरले. त्याने सांगितले की क्रिकेटमध्ये वाईट आणि चांगले दिवस येतील पण तुम्हाला ते स्वीकारावे लागेल आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या खेळासाठी समर्पित राहावे लागेल.”
शाहनवाज पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघाचा भाग आहे आणि त्याने २०२१ मध्ये पाकिस्तानसाठी दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दहाणीने सांगितले आहे की धोनी व्यतिरिक्त, तो इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि न्यूझीलँडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांचा चाहता आहे. तसेच त्याने या दोघांनाही भेटण्याची इच्छा जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली?”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
- ‘सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न’ अजित पवारांचा अप्रत्यक्ष टोला
- “लवकरात लवकर मदत पाठवा”, राहुल गांधींनी पोस्ट केला ‘तो’ व्हिडिओ
- भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
- …तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही?- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

