Share

‘महाविकास आघाडी दाऊदचे समर्थन करत आहे’ – चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘नवाब मलिक यांची पाठराखण करणं म्हणजे ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या दाऊद आणि इतर गुन्हेगारांचं समर्थन करणं. संजय राठोड यांच्या वेळेस भाजपने आंदोलन केल्यावर तात्काळ त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. जर शिवसेनेच्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला जातो, तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? याचा शिवसेनेच्या नेत्यांनी विचार करावा’, असे पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!