मुंबई : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. दोघेही कधी डिनर डेटवर तर कधी फॅमिलीसोबत दिसले आहेत. दरम्यान, शुक्रवारी हृतिकने सबाच्या स्टेज परफॉर्मन्सपूर्वी सबाचा जयजयकार करत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. हृतिकने सोशल मीडियावर सबासाठी पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सबा आझाद आणि तिचा एक्स प्रियकर इमाद शाह शुक्रवारी पुण्यातील एका स्टेज शोसाठी निघाले होते. यावर हृतिकने त्याला चिअर करत पोस्ट केली ‘Kill it you guys’. साबा आणि इमाद यांचा मॅडबॉय/मिंक नावाचा इलेक्ट्रो-फंक बँड आहे, ज्याने शुक्रवारी रात्री पुण्यात सादरीकरण केले. शोच्या आधी हृतिकने सबाला खास शैलीत तिला शुभेच्छा दिल्या. हृतिकच्या या पोस्टमुळे त्याच्या सबासोबतच्या अफेअरच्या चर्चांमध्ये भर पडताना दिसत आहे.

याआधी सबाच्या एका परफॉर्मन्सवर हृतिकची एक्स वाईफ सुजैन खानने तिचं कौतुक केलं होतं. सबा अत्यंत प्रतिभावान असल्याचे वर्णन तिने केले होते. सबा आणि हृतिकच्या डेटींगच्या वृत्तावर सध्या या दोघांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :


