Share

‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी धक्कादायक खुलासे केल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. प्रभाकर यांनी केलेल्या आरोपानंतर समीर आणि प्रभाकर यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता समीर वानखेडे यांनी या फोटो आणि ट्विट संदर्भात प्रत्युत्तर दिले आहे.

समीर यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी समीर म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडल वर प्रकाशित केले आहेत ज्यात ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नाव घेत ‘फर्जीवडा हुआ’ असे सांगितले गेले आहे. याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे’, असे ते म्हणाले.

तसेच पुहे ते म्हणाले की,’मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले’, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, पुढे ,’ट्विटरवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदनीय आहे आणि माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला, माझे कुटुंब, माझे वडील आणि माझ्या दिवंगत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे. माननीय मंत्र्याकडून कोणतेही औचित्य न बाळगता वैयक्तिक, बदनामीकारक आणि निंदनीय हल्ल्यांच्या प्रकारामुळे मी दुःखी झालो आहे’, असेही समीर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!