Share

‘भारतात मुस्लिम कधीच बहुसंख्याक होणार नाहीत’, काँग्रेस खा.दिग्वजिय सिंह यांचा दावा

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल’, असे वक्तव्य केले होते. यावरुन नवा वाद पेटला आहे.

‘जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए सारखाच आहे, तर जातीय द्वेष का पसरवला जातोय आणि लव्ह जिहाद सारख्या मुद्यांची गरज काय आहे?’ असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. इंग्रजांच्या लोकांना विभाजित करा आणि राज्य करा या धोरणानुसार देशात खोट्या गोष्टी पसरवून हिंदू आणि मुस्लिमांची विभागणी केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

दिल्ली येथे काँग्रेस, डावे पक्ष आणि कामगार संघटनांच्या ‘सांप्रदायिक सद्भाव परिषदे’त ते म्हणाले की, ‘बहुपत्नीत्वामुळे लोकसंख्येत सातत्याने वाढ होऊन पुढील १० वर्षात देशातील मुस्लिम अल्पसंख्याकातून बहुसंख्याक होतील आणि बहुसंख्याक अल्पसंख्याक होतील, असा चुकीचा प्रचार काही लोकांकडून सुरू आहे. मी भागवत यांच्यासह संघाच्या प्रचारकांना आव्हान देतो की त्यांनी या विषयावर सार्वजनिक चर्चेसाठी यावं, या देशात मुस्लिम कधीही बहुसंख्याक होऊ शकत नाहीत हे मी सिद्ध करून दाखवेल’ असेही खासदार दिग्विजय सिंह म्हणाले.

‘आरएसएस आणि भाजपच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. रावणाचे १० चेहरे होते आणि त्याच्या प्रत्येक मुखातून वेगवेगळ्या गोष्टी बोलायचा, तीच अवस्था भाजपची आहे. एकीकडे संघाचे कार्यकर्ते विषारी बोलतात, तर दुसरीकडे हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच आहेत, असे भागवत म्हणतात’ अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!