मुंबई : मशिदीवरील भोंगे यावर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेले असताना आता या वादावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. “नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो तसेच शिवजयंती, भीमजयंती वेळी डीजे लावला जातो तेव्हा मुस्लिमांना त्रास होतो, पण त्यांनी तक्रार केली केली नाही. त्यांनी तक्रार केली नाही. ते याबद्दल अजिबात तक्रार करत नाहीत, ” असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद केला. त्या दरम्यान ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरेंनी जी धमकी दिली आहे. त्याचा महाराष्ट्र सरकारने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लीम समाजाची संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. भोंगे ज्यांना लावायचा आहे त्यांनी लावावा. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो तसेच शिवजयंती, भीमजयंती वेळी डीजे लावला जातो तेव्हा मुस्लिमांना त्रास होतो, पण त्यांनी तक्रार केली केली नाही. ते याबद्दल अजिबात तक्रार करत नाहीत.” असे आठवले म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण भोंगे या मुद्द्यावर तापलेले आहे. मनसेची आगामी सभा, महाआरती, आणि अयोध्या दौरा पाहता या विषयावर मनसे आता अधिकाधिक आक्रमक होण्याची चिन्हे दसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

