Share

IPL 2022 DC vs PBKS : आज कोण मारणार बाजी? वाचा दोन संघांचा इतिहास काय सांगतो!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ३२वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs PBKS) यांच्यात थोड्याच वेळात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जची कामगिरी कामगिरी अतिशय संमिश्र आहे. त्यांनी तीन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खराब फलंदाजीमुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. संघ सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्सने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जला त्यांच्या मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता आणि दिल्ली कॅपिटल्सचीही तीच स्थिती होती. त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुणतालिकेत पुढे जायचे आहे.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत एकूण २८ आयपीएल सामने झाले आहेत, त्यापैकी पंजाबने १५ सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सने १३ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या फलंदाजांपैकी डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक ९४५ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जच्या सध्याच्या फलंदाजांपैकी शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १५ सामन्यांमध्ये ५२२ धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाब किंग्ज विरुद्ध ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या. राहुल चहरने पंजाब किंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ५ सामन्यात ५ बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!