Share

धनंजय मुंडेंच्या ‘अर्धवटराव’वर मनसेचा ‘ओम फट स्वाहा’चा उतारा

Published On: 

मुंबई : धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचं थेट नाव न घेताच त्यांच्यावर अर्धवटराव अशी टीका करून खिल्ली उडवली होती. आता मुंडेंच्या याच टीकेवर मनसेची प्रतिक्रिया आली आहे. “तुम्ही ज्यांना अर्धवटराव म्हणता ते राजसाहेब तुम्हाला ‘ओम फट स्वाहा’ करून टाकतील, असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या सभेदरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, “आम्ही लहानपणी रामदास पाध्ये यांचा कार्यक्रम पाहायचो. त्यांच्या हातात अर्धवटराव नावाचा एक पुतळा असायचा. जे रामदास पाध्येला बोलायचे नाही, ते पाध्ये अर्धवटरावाच्या तोंडून बोलायचे. आज भाजप अर्धवट रावाच्या तोंडून बोलत आहे. या अर्धवट रावांनी मागच्या निवडणुकीत भाजपची सीडी लावली. त्यानंतर त्यांच्यामागे ईडी लागली आणि आता ते म्हणतायत कुठेय ती सीडी?”

कालपासूनच या टीकेची सगळीकडे चर्चा होत होती. आता धनंजय मुंडे यांनी केलेल्या याच टीकेचा समाचार घेत अमेय खोपकर यांनी पलटवार केला आहे.”तुम्ही ज्यांना अर्धवटराव म्हणता ते राजसाहेब तुम्हाला ‘ओम फट स्वाहा’ करून टाकतील,” असे अमेय खोपकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!