Share

…अन् ‘लालपरी’ला पाहून महिला कर्मचाऱ्यांना कोसळलं रडू!

Published On: 

सांगली : न्यायालयाचा आदर राखत सांगलीत 300 एसटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. आज सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत एसटी डेपोत जाऊन लालपरीचे स्टेअरिंग सांभाळले. यावेळी गेली साडेपाच महिन्यापासून लालपरीपासून दूर असल्याने आज लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचार्यांना रडू कोसळले.

यावेळी महिला कर्मचाऱ्यानी लालपरीचे चुंबन घेत लालपरीला मिठी मारत महिलांनी आपल्या अश्रूला वाट दिली. त्यामुळे एसटी डेपोतील वातावरण गहिवरून गेले होते. यावेळी सर्वच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन लालपरीची सेवा करण्याची ग्वाही दिली. याचबरोबर आम्ही सर्व गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबाही राहील अशी घोषणाही केली.

राज्यातील ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ पासून संप पुकारला होता. त्‍यामुळे एसटी सेवा ठप्प झाली होती. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. आता हायकोर्टच्या आदेशानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!