मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात जाऊन राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हसन मुश्रीफ यांनी तिसरा १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ‘हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
यावर आता मुश्रीफ यांनी सोमय्यांना जसेच्या तसे उत्तर दिले आहे. सोमय्यांनी १५०० कोटींच्या घोटाळ्याचा कुठून जावई शोध लावला? माझ्या जावयाचा यात काही संबंध नाही, विनापुरावे ते बोलत आहे’ असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांवर केला. तसेच कोल्हापूर सत्र न्यायालयात किरीट सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, दुसऱ्या घोटाळ्याचा उल्लेख दिसला नाही. कोल्हापूर सत्र न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्याशिवाय त्यांनी अशी वक्तव्य करु नये यासाठी बंदी आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी न्यायालयाने ठेवली होती. परंतु त्यांनी नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे आज सुनावणी होऊन एकतर्फी निकालाची शक्यता आहे.
‘किरीट सोमय्या माझ्या जावई आणि कुटुंबीयांची नावं उगाच घेत आहेत. माझ्या जावयाचा यात काहीही संबंध नाही. आयुष्यभर आपण नाव कमावतो आणि एका दिवसात कुणीही येऊन खराब करण्याचा प्रयत्न करतात, पण मी हे होऊ देणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळे करण्याच्या विविध कला ठाकरे आणि पवारांनी निर्माण केल्यात’
- आर आर पाटलांच्या सख्ख्या भावाकडे सोमय्यांनी केली हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार
- ‘मुंबै बँकेच्या बदनामीवरून उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा’, प्रवीण दरेकरांची माहिती
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- ‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
