कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापूरच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.
दरम्यान, सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. यानंतर मुरगूड येथे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळे करण्याच्या विविध कला ठाकरे आणि पवारांनी निर्माण केल्यात. विविध नेत्यांनी भ्रष्टाचार केले आहेत. मी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर आणला आहे. त्याची रीतसर तक्रार करण्यासाठी कोल्हापुरात आलो. पोलिसांना मी पुरावे दिले आहेत. त्यांना याची दखल घ्यावीच लागेल कारण, जी कंपनी आधीच बंद झाली अशा कंपनीच्या नावाने बँक अकाउंट बनवले गेले. याचे चेक आले, आणि मुश्रीफ यांच्या मुलाने ते साखर कारखान्यात टाकले,’ असा आरोप करतानाच सोमय्या यांनी मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल १५०० कोटींचा घोटाळा केल्याचं म्हणत नवा घोटाळा बाहेर आणल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले


