औरंगाबाद : कुल्फीची गाडी गल्लीत उभी करण्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जाऊन शेजारी असलेल्या एका कुल्फी विकणाऱ्या ४५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला आरोपीने रागाच्या भरात मयताच्या डोक्यात हतोडीचा वार केला हा वार थेट वर्मावर बसल्याने कुल्फी विक्रेता जागीच कोसळला गंभीर जख़मी तसेच रक्तबंबाळ अवस्थेत प्रजापती यास उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राण ज्योत मावळली ही घटना रविवारी दि.२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान खून करून फरार झालेल्या आरोपी करीम शहा यास जालना जिल्हातील शाहगड येथून पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे
मिळालेल्या माहितीनुसार गेस्ट हाऊस रोड फकीर वाडा भागात शेजारी मूळचा उत्तरप्रदेश येथील कुल्फी विक्रेता मायाशंकर प्रजापती वय ४५ वर्षे हल्ली मु.गेस्ट हाऊस रोड पैठण हा गेल्या अनेक वर्षांपासून कुल्फीचा व्यवसाय करीत उदरनिर्वाह चालवत याठिकाणी कुटूंबासह राहत होता शेजारी राहत असलेल्या करीम शहा वय २५ वर्षे यांच्या सोबत सार्वजनिक गल्लीत हातगाडी लावण्यावरून दोन-तीन वेळेस वाद झाला होता याच कारणावरून रविवारी सकाळी प्रजापती व करीम शाह यांच्यात किरकोळ कुरबुरी नंतर वाद विकोपाला गेला रागाच्या भरात माया शंकर प्रजापती याच्या डोक्यात वआरोपी करीम शाह ने हतोडीने हल्ला केला ज्यात प्रजापती गंभीर जखमी झाला.
जखमी प्रजापती घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आजूबाजूच्या नागरिकांनी प्रजापतीला उपचारासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद घाटीत नेण्याचा सल्ला दिला परंतु प्रजापतीचा अधिक रक्तस्त्राव झाल्याने वाटेतच प्रजापती याची प्राण ज्योती मावळली घटनेनंतर आरोपी करीम शहा हा फरार झाला होता दरम्यान फरार झालेल्या आरोपीस पैठण पोलिसांनी जालना जिल्ह्यातील शाहगड येथून अटक केली आहे मयताची पत्नी सुनीता माया शंकर प्रजापती ४० रा.गेस्ट हाऊस हिच्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- ‘दहा कोटी द्या, अन्यथा नांदेडचे कलेक्टर ऑफिस उडवून टाकेल!’
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- नांदेडच्या महिलेला फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अमेरिकेतील दोघांनी लाखोंना फसवले
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

