🕒 1 min read
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालुन वंचित, शोषित, दुर्लक्षित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून शिक्षकांना न्याय देणारी एकमेव संघटना म्हणजे ‘महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशन’ अर्थात ‘मुप्टा’ आहे. असे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे यांनी केले. वैजापूर शहरात आयोजित मुप्टा संघटनेची सहविचार सभेत ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख अशोक त्रिभुवन तर प्रमुख पाहुणे म्हणून मुप्टाचे डॉ. भास्कर टेकाळे, प्रा.इम्रान पठाण, प्रा.अमोल सरदार उपस्थित होते. प्रा. मगरे पुढे म्हणाले कि, केवळ पंधरा शिक्षकांच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या या संघटनेचे वटवृक्षात रुपांतर झाले असून जीवनाच्या शेवटपर्यंत शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून शिक्षकांच्या हक्कासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विलास त्रिभुवन यांनी ‘मुप्टा’च्या कार्यशैलीची उपस्थितांना माहिती दिली. आगामी काळात वैजापूर तालुक्यात शिक्षकांचे भव्य अधिवेशन घेऊन यात शिक्षक व पदवीधर आमदार यांना पाचारण करण्याचा मनोदय प्रा.सुनील मगरे यांनी यावेळी व्यक्त केला. काही दिवसापूर्वीच वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला होता त्यातील ‘मुप्टा’चे पदाधिकारी सुधीर पठारे, उज्वला गवळी-दिवेकर, संजय कुमावत, सोनाली कुमावत यांचा ‘ मुप्टा’चे सचिव प्रा.सुनील मगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा
- अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची रयतने केली होळी


