Share

माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

चिपळूण : ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री मला बाजूला करत आहेत’, अशी भावना शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली.

ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते. ‘बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक’ अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून खास करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कदम हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या सहा पानी पत्रात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या गोटातून मंत्री झालेलेच आपल्याला संपवण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत याची माहिती दिली आहे. काही मंत्र्यांच्या नावांचा देखील पत्रात उल्लेख आहे. निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात असल्यामुळे मी नाराज आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावाही रामदास कदम यांनी पत्रात केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!