मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच खासदार रजनीताई पाटील यांनी दिल्ली येथे सोनिया गांधींची भेट घेतली. त्यांनी या वेळी सोनिया गांधींचे आभार मानून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिहारी नागरिकांचा मृत्यू झाल्याने जम्मू-काश्मीरमधील सद्य:स्थितीची माहिती तिथल्या प्रभारी या नात्याने दिली. तसेच मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व त्यामुळे झालेले नुकसान याचीही खासदार पाटील यांनी माहिती दिली. अनेक विषयांवर त्यांनी या वेळी चर्चा केली. खासदारपदाची जबाबदारी दिल्याने त्यांनी आभार व्यक्त केले.
सांसद बनने के बाद कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनिया गांधी जी से आज शिष्टाचार भेंट हुई एवं उनका कुशल क्षेम जाना।
इस मुलाकात के दौरान जम्मू-कश्मीर व लखीमपुर के संवेदनशील हालातों के बारे में भी चर्चा की गई। pic.twitter.com/LevdSGjZ2b
— Rajani Patil (@rajanipatil_in) October 19, 2021
बीड काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या २१ तारखेला मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजकिशोर मोदी हे मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
एकीकडे रजनी पाटील यांना राज्यसभेवर खासदार करून बीड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असतानाच राजकिशोर मोदी यांनी मात्र काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. राजकिशोर मोदी यांच्या ताब्यात मागच्या तीस वर्षापासून अंबाजोगाई नगरपालिका आहे. आता मोदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद मोदींमळे नक्कीच वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर
- पात्रता नसताना सत्ता आल्याने जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटले- भाजपची टीका


