Share

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची रयतने केली होळी

Published On: 

🕒 1 min read

नायगाव : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेली तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून रयत क्रांती संघटनेने आज आंदोलन केले. रयतच्या वतीने संपूर्ण राज्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या विरोधात होळी आंदोलन झाले.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर सुद्धा सरकारी व्यवस्था शेतकऱ्याला तोकडी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम करत आहे सरकारच्या विरोधात यावेळी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश दिसला. यामुळेच नायगाव तहसील कार्यालय समोर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होळी आंदोलन झाले. या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली.आपल्या मागण्याचे हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होते.

यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले की सरकारने २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आल्यानंतर तो जीआर लागू केला आहे तो जीआर संपूर्ण मराठवाड्यात लागू करावा. चालू खातेदाराचा कर्ज माफ करावे नद्या-नाल्यांना शेतकऱ्यांना विशेष मदत करावी आणि सन २०२०-२१ व २०२१-२२ या काळातील पिक विमा १०० टक्के लागू करावा आणि केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या साठा मर्यादाचे हे निर्बंध हटवावे व खाद्य तेलाची आयात शुल्क कमी करण्याचे धोरण रद्द करावे अशा मागण्या घेऊन आज आणि सरकार दरबारी आलो आहोत, सरकार जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल कायदा-सुव्यवस्था बिघडला तर त्याला सरकार जबाबदार असेल.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाजी कदम, युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, जिल्हा सरचिटणीस गणेश गिरगावकर, अवधूत कदम, शिवाजी गायकवाड, शंकर तमनबोईनवाड ,विश्वनाथ शिंदे, सोनालीताई हंबर्डे, विजयाताई काचावार व अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!