Share

मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करतांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती करण्यासाठी राऊत हे गडकरींना भेटण्यास गेले होते असे सांगण्यात येत आहे.

कोकणातील संगमेश्वर-लांजा या रस्त्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे या कामाकरिता चांगले कंत्राटदार नेमावे आणि काम लवकर पूर्ण करावे अशी विनंती विनायक राऊत यांनी केली. ‘मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान’ असे विनायक राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, राऊत आणि गडकरी यांच्यात या वेळी या विषयाच्या व्यतिरिक्त देखील अनेक विषयावर चर्चा झाली असे सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा गडकरींची आज भेट घेतली. या भेटी वेळी पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या त्यानंतर राऊत आणि मुंडे भगिनींनी गडकरीची भेट घेतल्याने अनेक जणांच्या भुवया उंचावल्या. बीड मधील विकास कामा संदर्भात गडकरीना भेटले तसेच नितीन गडकरी यांनी विकास कामासाठी भरभरून मदत केल्याने पंकजा यांनी गडकरींचे आभार देखील मानले. यावेळी त्यांच्या  सोबत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार माधुरी मिसाळ हे पण उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!