औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. उपचार यंत्रणा कमी पडू नये म्हणून कोरोना रुग्णांसाठी नवीन ५ हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग हा घराघरात पोहचला आहे. घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली तर ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. दररोज साधारणपणे आरटीपीसीआर आणि रॅपिड अण्टिजेनच्या दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या होत आहे. काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह रेट १२ टक्के एवढा होता. आता तर दररोज सुमारे सहाशे रुग्ण दररोज आढळत आहे. तर रविवारी तब्बल ७९३ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे पॉझिटिव्ह रेट १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता मनपा रुग्णांकरिता ५ हजार नवीन बेडची व्यवस्था करणार आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने एमएचएमएच या अँपद्वारे नागरिकांमध्ये उपलब्ध बेडची माहिती प्राप्त होणार आहे. या अँपचा जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा असे आवाहन देखील प्रशासकांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात रविवारी 87 व्यक्ती कोरोनाबाधित, एका रुग्णाचा मृत्यू
- भाजपचा मास्टर प्लान,केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना भाजपने दिले विधानसभेचे तिकीट
- ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात : निवडणूक आयोग
विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉने रचला इतिहास
- सुर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या समावेशानंतर मायकल वॉनचे हे टिवट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

