🕒 1 min read
अहमदाबाद : रविवारी भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी दिली आहे. या निर्णायानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये ते म्हणतो की बीसीसीआयने माझा सल्ला चांगलाच मनावर घेतला आहे. त्यांनी आज भारतीय संघात मुंबई इंडीयन्सच्या दोन खेळांडुना संधी दिली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघापेक्षा आयपीएल मधील मुंबई इंडीयन्सचा संघ उत्तम आहे. असे खोचक ट्विट केले होते. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने त्याला चांगलेच उत्तर दिले होते. मात्र आज संघाची घोषणा केल्यानंतर मायकल वॉनने पुन्हा एकदा ट्विट केले आहे.
I see @BCCI have taken the advice & got more @mipaltan players involved … Very smart move … #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
आता या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू कडून काही उत्तर मिळते का याची वाट नेटकर्ते पाहत आहे. या दरम्यान दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंड संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सुनील केंद्रेकरांनी घेतली तातडीची बैठक, खासगी रुग्णालयांना केल्या सूचना
- ‘सचिन वाझे हे प्रामाणिक, ओवेसी सोबत युती म्हणजे हिंदुत्व…हेच राऊतांचं शब्दकोश’
- जालन्याच्या वृद्धाची औरंगाबादेत आत्महत्या
- राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोलेही आमच्याकडे येऊ शकतात : आठवले
- लातूरकरांनो खबरदार! घराबाहेर पडाल तर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
