Share

ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात : निवडणूक आयोग

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.

नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.

नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता. दरम्यान, ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले. मात्र तरीही या प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

ममता बॅनर्जींना नंदिग्राममध्ये झालेल्या दुखापतीप्रकरणी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्याचे डीएम आणि एसपींनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!