परभणी : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 87 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण 361 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत 343 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत एकूण 9 हजार 273 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. 8 हजार 569 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त 36 व्यक्तींना सुट्टी दिली आहे. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 40 हजार 952 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 31 हजार 100 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 9 हजार 120 व्यक्तींचे नमुने पॉझिटीव्ह, 592 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र तीन दिवसांपासून कोराना रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. यावर प्रशासन ठोस उपाययोजना करत आहे. परंतू तरीही कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या बद्दल सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सोमवारी लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासन पुन्हा काय निर्णय घेतात याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

