Share

भाजपचा मास्टर प्लान,केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना भाजपने दिले विधानसभेचे तिकीट

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये टीएमसीला शह देण्यासाठी भाजपने नवीच खेळी खेळली आहे. भाजपने थेट केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रियोसहीत चार खासदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. भाजपच्या या नव्या खेळीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजपने बाबुल सुप्रियो यांना टॉलिगंजमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. खासदार निशीथ प्रमाणिक यांना दिनहाटा विधानसभा मतदारसंघातून तर खासदर लॉकेट चटर्जी यांना चुंचुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच राज्यसभा सदस्य स्वपन दास गुप्ता यांना तारकेश्वरमधून तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपने आज उमदेवारांची तिसरी यादी जारी केली आहे. त्यात एकूण २७ जणांची नावं आहेत. यात अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश आहे. टीएमसी सोडून भाजपमध्ये आलेल्या राजीव बॅनर्जी यांना डोमजूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.

दरम्यान, बाबुल सुप्रियो, निशीथ प्रमाणिक, लॉकेट चॅटर्जी आणि स्वपन दास गुप्ता यांना निवडणूक मैदानात उतरवल्याने आज दिवसभर त्यांचीच चर्चा होती. भाजपला बंगालमध्ये पराभव दिसत असून चांगले उमेदवार मिळत नसल्यानेच खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचीही चर्चा सध्या रंगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!