औरंगाबाद : अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे शनिवारी शहरातील आठ केंद्रावर दुपारपर्यंत लसीकरण सुरु होते. शहरातील इतर केंद्रांवर दोन दिवस लसीकरण बंद होते. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला २५ हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२६) शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु झाले असून नागरिकांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र मनपा प्रशासनाने दिड लाख लसींची मागणी केलेली असतांना शासनाने केवळ २५ हजारांवर औरंगाबाद पालिकेची बोळवण केली आहे.
लसींचा पुरवठा सोमवार पर्यंत होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली होती. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला २५ हजार लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जम्बो लसीकरण मोहिम राबविण्याचे पालिकेने ठरवले आहे.
त्यानुसार पालिकेच्या वतीने शहरात सर्व ११५ वाॅर्डांमध्ये ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण मोहीम थांबेल, अशी शक्यता वाटत होती. या अनुषंगाने पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार पालिकेने शासनाकडे दिड लाख कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची मागणी केली होती. शासनाकडून पालिकेला रविवारी २५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र हा साठा संपण्याच्या पूर्वी नवीन लसी मिळतात का हे पाहावे लागेल अन्यथा लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुन्हा एकदा ही मोहीम संकटात सापडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘त्या’ रात्री अनिल देशमुखांच्या घरी अचानक सीबीआयचे अधिकारी पुन्हा आले
- ‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’
- गोडावून फोडून १ लाखाचे साहित्य लंपास, पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल
- भयावह! अंबेजोगाईत एकाच वेळी २८ जणांवर अंत्यसंस्काराची वेळ
- नशेच्या गोळ्या विकणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी


