औरंगाबाद : शहरातील दलालवाडी येथील औषधी भवन पुलाची उंची वाढविण्याचे काम एमएसआरडीसीसीने सुरू केले आहे. मात्र या नाल्यात वर्षानुवर्ष तुंबलेला कचरा काढण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुलाचे काम आता अर्ध्यावरच थांबले होते. या पुलाखाली थर्माकोल, प्लास्टिक, औषधीचे बॉक्स, चिंध्यांचा कचरा गच्च भरला आहे. पुलाखाली जाण्यास रस्ताच नसल्याने इतके वर्ष पालिकेने नाला सफाईकडे दुर्लक्ष केले. मात्र आता पुल तोडल्याने कचरा उचलने सहज शक्य आहे, तरी नालेसफाई सुरु केलेली नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर मनपा प्रशासनास जाग आली असून सोमवारपासून या नाल्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
राज्य सरकारने वर्षभरापुर्वी शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून शहरातील २३ रस्त्यांची कामे केली जात आहे. यात औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याचा कामाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडिसी) मार्फत हे काम केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांनी पुलाची उंची वाढविण्याचे काम केले. सलग दहा दिवसांच्या मेहनतीनंतर जुना पुल जेसीबीने तोडण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक पंधरा दिवसांपासून हे काम थांबवण्यात आले होते.
नाल्यात तुंबलेला कचरा काढल्याशिवाय नविन पुल उभारणी शक्य नाही. त्यात पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरुन वाताहत होऊ शकते. ही बाब लक्षात येऊनही पालिकेकडून नालेसफाईसाठी टाळाटाळ केली जात नसल्याने पुलाचे काम सुरु होण्याआधीच रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. यंदा पावसाळ्यापुर्वी नालेसफाई पुर्ण करा, नागरिकांची एकही तक्रार यायला नको, अशा शब्दांत पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकार्यांना बजावले आहे. त्यामुळे हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, शहरातील बालकाश्रमांकडून निर्णयाचे स्वागत!
- कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंनी लिहले ‘हे’ खास पत्र
- ‘आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, मित्रानो तुम्हा सर्वांची खूप जास्त आठवण येईल’; शालूची भावूक पोस्ट
- मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील
- ‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आयसीयूची व्यवस्था सुरू करणार’ – अरविंद निलंगेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
