मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडू आणि संघानी हटके ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला. यात मुंबई इंडियन्सने हटके स्टाईलमध्ये मराठीत ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला आहे. मुंबई इंडियन्सने ‘पलटन, आम्ही जिंकलो किंवा हरलो…तुमचा सपोर्ट नेहमी आपल्या टीम बरोबर होता! त्यासाठी मनापासून आभार ????’असे मराठीत ट्विट करत स्पर्धेचा निरोप घेतला आहे.
पलटन, आम्ही जिंकलो किंवा हरलो…तुमचा सपोर्ट नेहमी आपल्या टीम बरोबर होता! त्यासाठी मनापासून आभार ????
Win or lose, your constant support was always there with the team, Paltan! We thank you from the bottom of our hearts.
Stay home. Stay safe.#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/wFL3OTm01K
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2021
कोरोनाच्या काळात क्रिकेट रसीकांना विरंगुळ्याचा क्षण म्हणून आयपीएल स्पर्धेला बघीतले जाते. स्पर्धा रद्द झाल्याने अनेक क्रिकेट रसिकांचाही हिरमोड झाला आहे. आयपीएल स्पर्धा म्हणजे क्रिकेटचा कुंभमेळा समजला जातो. त्यात मुंबई इंडियन्सला महाराष्ट्राचा संघ म्हणून मानले जाते. स्पर्धेत चेन्नईचा धुव्वा उडवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला होता.
महत्वाच्या बातम्या
- परदेशी खेळाडूंचा मायदेशी परतण्याचा प्रवास सुरु !
- स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने ‘या’ संघाना आहे पुनरागमनाची संधी
- मायदेशी परतण्यापुर्वी बटलरने दिली यशस्वीच्या ‘यशा’साठी ‘ही’ खास भेटवस्तु
- ‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर तोंड काळे करा आणि कडी लावून निवांत घरी बसा’
- ‘पंतप्रधानांनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’


