Share

टी 20 पदार्पणानंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….

Published On: 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी अतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक केले आणि आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सुर्यकुमार यादवला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

सूर्यकुमारला दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाची कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं. सूर्याने ट्विटमध्ये आपल्या कुटुंबियांचे आभार मानले.“माझे आई वडील, ताई, बायको, प्रशिक्षक आणि इतर सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फल आहे. या क्षणासाठी आम्ही सर्वांनी वाट पाहिली. आमचं सर्वाचं एकत्र स्वप्न पूर्ण झालं”, असं सूर्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

मंगळवारी होणाऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करायला मिळते का हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!