🕒 1 min read
मुंबई: सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रत्युत्तरात कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरूच सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानडी पोलिसांकडून सातत्याने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप स्थानिक मराठी भाषिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार आणि कर्नाटक मधील भाजप सरकारवर निशाणा साधला असून मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये. असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला आहे.
‘कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने बेळगावसह सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले सुरू केले आहेत. मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे. त्याआधी बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून तेथे त्या कन्नड रक्षण वेदिकेवाल्यांनी लाल-पिवळा ध्वज लावला. त्यावरून मराठी तरुण आणि कानडी पोलिसांत झटापट झाली, त्यात गुन्हेगार ठरवले गेले ते मराठी तरुण. हे गेल्या सत्तरेक वर्षांपासून सुरूच आहे. आताही दोन दिवसांपूर्वी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून फार मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये. असा इशारा आजच्या सामना अग्रलेखातून कानडी संघटनांना देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्ह्यात 51689 कोरोनामुक्त तर 5796 रुग्णांवर उपचार सुरू ; आज 1128 रुग्णांची भर
- पियूष गोयल साहेब तुम्ही महाराष्ट्राचे, मराठवाड्यावर अन्याय का? : खासदार इम्तियाज जलील
- दुचाकी चालकावर फांदी पडल्याने चालक जखमी
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
- जालना : लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी; हॉटेल्स, खाद्यपदार्थ पदार्थांची दुकाने बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
