Share

तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी अतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक केले आणि आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सुर्यकुमार यादवला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

मंगळवारी होणाऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजी करायला मिळते का हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती.

मात्र त्याला फंलदाजी करायला संधी न मिळाल्यामुळे कर्णधार कोहली फलंदाजी क्रमवारीत बदल करुन सुर्यकुमार यादवसाठी बलिदान देईल का असा प्रश्न क्रिकेटरसीकांना पडला आहे. आयपीएल मध्ये मुंबई इंडीयन्स कडून सुर्यकुमार सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलदांजी करत असतो. या क्रमांकावर फलंदाजी करत सुर्यकुमारने मुंबई इंडीयन्सला अनेकदा विजय मिळवून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!