Share

आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.

दरम्यान, नियमित सलामीवीर रोहित शर्मा विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राहुलला संघाबाहेर जावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सर्वांचे लागले आहे ती हिटमॅन रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे. पहिल्या दोन सामन्यांत रोहितला विश्रांती देण्यात आल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.

पहिल्या दोन्ही सामन्यांत लोकेश राहुल अपयशी ठरला. शिवाय अनुभवी शिखर धवनला पहिल्या सामन्यात संधी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर बसविण्यात आले. अशा परिस्थितीत युवा ईशान किशनने संधी साधताना तडाखेबंद अर्धशतक झळकावले.

त्यामुळेच रोहित आणि ईशान अशी सलामी जोडी तिसऱ्या सामन्यात पाहण्यास मिळू शकते. शिवाय दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असल्याने ही जोडी नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वासही चाहते व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!