Share

आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लड संघादरम्यान पाच टी-२० सामन्याची मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या मैदानावर होत आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात आहे. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. सोमवारी संध्याकाळी बीसीसीआयने या संदर्भात टि्वट करुन एक पत्रक जाहीर केले आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!