Share

“वॉर्ड बदलेले तरी…”; मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा

Published On: 

मुंबई: ‘शिवसेनेला अनुकूल प्रभार रचना म्हणजे नक्की काय? मराठी माणसं? हिंदुत्ववादी? मुळात असं काही नसतं वॉर्ड बदलेले, तरी नाराजी बदलत नाही. मतदार तेच राहतात. झोपलेली महाविकास आघाडी हा महत्वाचा मुद्दा आहे.’ असे वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बदलेल्या प्रभाग रचनेबद्दल संदीप देशपांडे बोलत होते. तसेच मनसे सध्यातरी कोणाबरोबर आघाडी न करता स्वतंत्र लढणार आहे, अशी माहिती ही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी, २ फेब्रुवारीला पार पडली. त्यावेळी संदीप देशपांडे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मनसे अध्यक्षांनी त्यांच्या पदाधिकांऱ्याना २० फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीसाठीचा अहवाल सदर करायला लावला आहे. त्यानंतर सोशल मिडीया आणि निवडणुकीसंबंधित विविध कमिट्या स्थापन केल्या जातील, असे ही संदीप देशपांडेनी नमूद केले आहे. या बैठकीला मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्याचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये युतीची चर्चा रंगत होती. मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे दिसत आहे. या निवडणूकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचा मोठा सामना होणार आहे. त्यामुळे यात मनसे नक्की काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईकडे अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केले आहे, हा मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नाला उत्तर देत संदीप देशपांडे म्हणाले, मुंबईचे महत्व गेल्या १५० वर्षात कोणाला कमी करता आले नाही, आणि तशी हिम्मत कोणाच्या बापात नाहीये. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या पदरी या अर्थसंकल्पाने निराशाचं दिली आहे. तिच्या महत्वाला साजेशा तरदुती या अर्थसंकल्पात झालेल्या नाहीत. अशी भावना महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!