मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला असल्याची माहिती सध्या मिळत आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरातील स्थिती कोरोनामुळे गंभीर बनली आहे. दरम्यान मुंबईतल्या कोरोनाच्या परिस्थितीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविड रुग्णांना योग्य बेड मिळावं. म्हणून पाऊल उचलले असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिकेनं अॅक्शन प्लान तयार केला आहे.
आपण प्रत्येक वार्डात 2 नोडल अधिकारी नेमतोय. रुग्णांना रात्री बेडसाठी विशेषतः ते मदत करतील. मुंबईकरांना १९१६ वर फोन केल्यावर व्यस्त असल्याचं कळतं. पण विनंती आहे. जिथे आपण राहतो त्या प्रभाग कार्यालयातील वॉर रूम मध्ये फोन करावं. त्यामुळे मदत मिळण शक्य होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. २४ तासाच्या आत अहवाल द्या. म्हणजे उपचार लवकर देता येतील आणि योग्य ठिकाणी वर्गवारी करून त्यांना दाखल करता येईल, असं पालिकेनं लॅबला सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच खासगी रुग्णालयात लक्षणे नसलेले रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये आपण त्यांना राहण्यासाठी कोविड सेंटरसारखी व्यवस्था करून देऊ, पैसे त्यांनाच भरावे लागतील. त्यांना हॉटेल निवडण्याची परवानगी असेल. तिथे सगळी रुग्णालयाप्रमाणे व्यवस्था असेल, अशी माहितीही महापौरांनी दिली आहे. सगळी सोय तिथे असेल. कारण नसताना बेड अडवू नये म्हणून निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबईत आणखी चार मोठे कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. मुंबईत दररोज दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत आणखी चार जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- सरकार कुठपर्यंत पोहोचणार, त्यांना दोष देऊन उपयोग नाही : नाना पाटेकर
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

